लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्मं पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी

भिजून गेला वारा - क्षितिज तारे, निहीरा जोशी - इरादा पक्का

भिजून गेला वारा - क्षितिज तारे, निहीरा जोशी - इरादा पक्का
गायक: क्षितिज तारे, निहीरा जोशी
संगीतकार: निलेश मोहरीर,
गीतकार: अश्विनी शेंडे
चित्रपट: इरादा पक्का
भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा
बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला
ये ना जरा तू, ये ना जरा
चाहूल हलके दे ना जरा
ये ना जरा तू, ये ना जरा
चाहूल हलके दे ना

झिम्माडं पाऊस, तू नको जाऊस
चुकारं ओठ हे बोले
श्वासातं थरथर, सरीवर सर
मन हे आतूर झाले
ये ना जरा तू, ये ना जरा
मिठीत हलके घे ना जरा
ये ना जरा तू, ये ना जरा
मिठीत हलके घे ना

भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा
बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला

स्पर्शात वारे, निळे पिसारे
आभाळ वाहून गेले
तुझ्यात मी अन माझ्यात तू
कसे दोघात जग हे न्हाले
ये ना जरा तू, ये ना जरा
मिटून डोळे घे ना जरा
ये ना जरा तू, ये ना जरा
मिटून डोळे घे ना

भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा
बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला

का कळेना - स्वप्नील बांदोडकर

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
गायक: स्वप्नील बांदोडकर
संगीतकार: अविनाश-विश्वजीत
गीतकार: श्रीरंग गोडबोले, सतीष राजवाडे
चित्रपट: मुंबई पुणे मुंबई

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे जन्मांतरीचे

एक मी एक तू,
शब्द मी गीत तू
आकाश तू, आभास तू
साऱ्यात तू
ध्यास मी श्वास तू
स्पर्श मी मोहर तू
स्वप्नात तू, सत्यात तू
साऱ्यात तू

पंख लाऊनी, उडत चालले मन हे तुझ्यासवे
तुझा मी माझी तू, कधी केंव्हा कसे जुळले बंध हे
अबोल प्रीत ही, हे नाते नवे
अजब रीत ही, हे स्वप्न नवे

या भोवताली, काही दिसेना
तू आणि मी, मी आणि तू, काही बाकी उरेना
होतो कुठे अन, आलोतं कोठे
रस्ता कुठे जाई कसा, काही कळेना

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे जन्मांतरीचे

Ka Kalena - Swapnil Bandodkar - Mumbai Pune Mumbai

बावरा - क्षणभर विश्रांती

बावरा
गायक: ऋषिकेश कामेरकर, शिल्पा पै, अवधूत गुप्ते, जानवी प्रभू
संगीतकार: ऋषिकेश कामेरकर
गीतकार: गुरु ठाकुर
चित्रपट: क्षणभर विश्रांती

Bavara - Rishikesh Kamerkar, Shilpa Pai - Kshanabhar Vishranti

मराठी अभिमान गीत

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्मं पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या नहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलखात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधऊन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असेच कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

गीतः सुरेश भट
संगीतकारः कौशल इनामदार


घे लल्लाटी भंडार

घे लल्लाटी भंडार - अजय - संगीतः अजय - अतुल - जोगवा

मस्त शारदीय रात

मस्त शारदीय रात - सुरेश वाडकर - संगीतकारः अभिजीत राणे - मस्त शारदीय रात


नुसते नुसते डोळे भरताना - शंकर महादेवन, श्रेया घोषाल - समांतर

नुसते नुसते डोळे भरताना - शंकर महादेवन, श्रेया घोषाल - समांतर
Nuste Nuste Dole Bharatana - Shankar Mahadevan, Shreya Ghoshal - Samantar
संगीतकारः आनंद मोडक
गीतकारः सौमित्र

नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा.

अप्सरा आली - बेला शेंडे, अजय - नटरंग

Apsara Aali - Bela Shende, Ajay - Natarang
अप्सरा आली - बेला शेंडे, अजय - नटरंग - संगीतकारः अजय - अतुल - गीतः गुरू ठाकुर

The Playlist is unavailable until Jul. 24, 2010 because the uploader's account has reached its download limit.

Playlist